Sun. Aug 10th, 2025
विमा (Insurance) म्हणजे काय?

विमा (Insurance) म्हणजे काय?

विमा(Insurance) ही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह किंवा संस्था म्हणजेच पॉलिसीधारक की जो विमा विकत घेणार आहे आणि विमा कंपनी की जी विमा विकणार आहे यांच्यातील एक आर्थिक व्यवहार किंवा करार आहे. ज्यामध्ये पॉलिसीधारक विशिष्ट जोखीम किंवा नुकसानीपासून आर्थिक संरक्षण किंवा परतफेड करण्याच्या बदल्यात नियमित अधिमूल्य म्हणजे एक ठराविक रक्कम विमा कंपनीत भरतो.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आर्थिक नुकसानीच्या संकटापासून संरक्षण प्रदान करण्याचे काम हे विमा करते. जर विमा उतरवलेली घटना (जसे की अपघात, आजारपण, आग, चोरी किंवा मृत्यू) घडली तर विमा कंपनी विमाधारकाला किंवा त्यांच्या लाभार्थ्यांना वीमा धोरणांच्या अटींनुसार भरपाई देते.

विमा (Insurance) घेताना त्यामध्ये काही महत्त्वाचे घटक (Components) असतात, जे विमा पॉलिसीच्या संरचनेत आवश्यक भूमिका बजावतात. खाली विम्याचे प्रमुख घटक दिले आहेत:

विम्याचे प्रमुख घटक(Factors of Insurance):
अ.क्र.विम्याचे प्रमुख घटकथोडक्यात माहिती

१.
विमा धारक (Policyholder)जी व्यक्ती किंवा संस्था अधिमूल्य (Premium) देऊन विमा खरेदी करते आणि लाभ घेण्याचा अधिकार ठेवते.
२. विमा कंपनी (Insurer)ज्या कंपनी मध्ये विमा धारक अधिमूल्य (Premium) भरतो आणि ती कंपनी त्या विमाधारकाला जोखीम स्वीकारून नुकसान झाल्यास भरपाई देते. अर्थात जी कंपनी विमा सेवा देते.
३.जोखीम (Risk)कोणतीही अनिश्चित घटना जी नुकसान घडवू शकते, उदा. अपघात, आजार, मृत्यू, आग इत्यादी.
४.अधिमूल्य (Premium)विमा पॉलिसीसाठी विमा धारकाने भरावयाची रक्कम.
ही रक्कम दर महिन्याला, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक स्वरूपात भरता येते.
५.नामनिर्देशित (Nominee)विमा धारकाच्या मृत्यूनंतर ज्याला विमा लाभ मिळणार आहे ती व्यक्ती
६.दावे आणि भरपाई (Claim and Settlement)जर विम्याच्या अटींमध्ये नमूद घटना घडली तर विमा कंपनीकडे दावा केला जातो आणि कंपनी भरपाई देते.
७.विमा रक्कम (Sum Assured / Coverage)विमा कंपनीकडून मिळणारी जास्तीत जास्त भरपाई रक्कम.
८.पॉलिसी मुदत (Policy Term)विमा किती कालावधीसाठी वैध आहे हे सांगणारा कालखंड.
९.अपवाद (Exclusions)अशा घटना किंवा परिस्थिती ज्या विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट नसतात. उदा. आत्महत्या, गैर कायदेशीर कृत्ये.

विम्याचे महत्त्व (Importance Of Insurance):  वैयक्तिक, व्यवसायिक आणि आर्थिक स्थिरतेमध्ये विमा  (Insurance) महत्त्वाची भूमिका बजावतो. विमा का महत्त्वाचा आहे याची प्रमुख कारणे येथे आहेत.

१.आर्थिक संरक्षण (Financial Protection):

अपघात, आजारपण, चोरी, नैसर्गिक आपत्ती किंवा मृत्यू यासारख्या घटनांमुळे होणाऱ्या अनपेक्षित आर्थिक नुकसानापासून आपल्याला संरक्षण देतो. उदा. रुग्णालयाचे बिल, कार दुरुस्ती किंवा घराचे नुकसान यांसारखे अचानक आलेले मोठे खर्च भरून काढण्यास आपल्याला मदत करते जे आपल्याला परवडू शकत नाहीत.

आर्थिक संकटापासून आपले संरक्षण झाले आहे याची आपल्याला  विमा कंपनी कडून हामी मिळाल्यामुळे आपल्याला एक मानसिक आराम मिळतो. आरोग्य विमा असो, जीवन असो किंवा मालमत्ता विमा असो, त्यामुळे जीवनात “जर असे आर्थिक संकट आले तर” या बद्दलचा ताण कमी होतो.

२. मनाची शांती (Peace of Mind):

आर्थिक संकटापासून आपले संरक्षण झाले आहे याची आपल्याला  विमा कंपनी कडून हामी मिळाल्यामुळे आपल्याला एक मानसिक आराम मिळतो. आरोग्य विमा असो, जीवन असो किंवा मालमत्ता विमा असो, त्यामुळे जीवनात “जर असे आर्थिक संकट आले तर” या बद्दलचा ताण कमी होतो.

३. कायदेशीर आणि सामाजिक दायित्वे (Legal and Social Obligations):

काही प्रकारचे विमा अनेक देशांमध्ये कायदेशीररित्या आवश्यक आहेत. जसे की वाहन विमा.  अशा प्रकाराचे विमा सार्वजनिक कल्याणात देखील योगदान देते – आरोग्य आणि जीवन विमा सार्वजनिक समर्थन प्रणालींवरील अवलंबित्व कमी करते.

. आर्थिक स्थिरता वाढवते.  (Promotes Economic Stability):  

व्यावसायिक दृष्टीकोनातून देखील विमा महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आर्थिक तोट्यातून वाचनाकरता मदत मिळते. विमा घेतल्यास आपल्याला आरोग्याच्या बाबतीतही संरक्षण मिळते, ज्यामुळे आपल्याला नाण्याच्या खर्चाद्वारे आर्थिक दबाव कमी होतो.

विमा गुंतवणूक आणि जोखीम घेण्यास प्रोत्साहन देऊन आर्थिक व्यवहारांना आधार देते. ते व्यवसायांना तोट्यातून सावरण्यास आणि कामकाज सुरू ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे रोजगार आणि वाढ टिकून राहते.

५. बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देते (Encourages Saving and Investment):

जसे की बचत घटकांसह जीवन विमा हे व्यक्तींना भविष्यासाठी नियोजन करण्यास मदत करतात.अशा प्रकाराचे विमा दीर्घकालीन संपती उभारण्यात एक साधन म्हणून सहायता करू शकतील.

विमा घेतल्याने भविष्याच्या आर्थिक संकटांपासून आपली बचत सुरक्षित राहते.

६. जोखीम व्यवस्थापन साधन (Risk Management Tool):

विमा कंपन्या विविध प्रकारच्या विमा योजनांची ऑफर देतात, ज्यामध्ये ग्राहकांची गरज पूर्ण केली जाते.

विमा व्यक्ती आणि व्यवसाय दोघांनाही जोखीम कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यास मदत करतो.कंपन्या अनेकदा त्यांच्या धोरणात्मक नियोजन आणि जोखीम कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून विम्याचा वापर करतात

भारतामध्ये विम्याचे मुख्य प्रकार (Types of insurance in India)

Types of insurance in India

१. जीवन विमा (Life Insurance):

विमा म्हणजे एक सुरक्षितता जिथे आपण अनपेक्षित घटनांपासून सुरक्षित राहतो.

या प्रकारच्या विम्यात विमा धारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते किंवा काही अशा योजना आहेत ज्या निवृत्ती/मॅच्युरिटी नंतर पैसे परत देतात.उदाहरणार्थ, जीवन विमा आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक आवश्यक साधन आहे

जीवन विम्याचे प्रकार:

  • टर्म विमा (Term Insurance) – निश्चित कालावधीसाठी असतो फक्त मृत्यूचा कव्हरेज मिळतो
  • पूर्ण आयुष्य विमा (Whole Life Insurance) – संपूर्ण आयुष्यभरासाठी विमा
  • एंडोमेंट योजना (Endowment Plan) – विमा + बचत, मॅच्युरिटीला पैसे परत मिळतात.
  • मनी बॅक पॉलिसी (Money Back Policy) – ठराविक कालावधीनंतर हप्त्यांमध्ये पैसे मिळतात.
  • युनिट लिंक विमा योजना (ULIP) – विमा + गुंतवणूक
  • निवृत्ती योजना (Pension Plans) – निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न

२.सर्वसाधारण विमा (General Insurance):

हा विमा माणसांव्यतिरिक्त इतर गोष्टींचा (मालमत्ता, आरोग्य, वाहन, प्रवास इ.) संरक्षण देतो.

सर्वसाधारण विम्याचे प्रकार:

  • आरोग्य विमा (Health Insurance): अपघात, आजार किंवा रुग्णालयीन उपचारांसाठी आर्थिक मदत मिळते.
  • वैयक्तिक आरोग्य विमा: फक्त एका व्यक्तीसाठी असते. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीच्या वैद्यकीय खर्चासाठी संरक्षण दिलं जातं.
  • फॅमिली फ्लोटर पॉलिसी: एकाच पॉलिसीत संपूर्ण कुटुंबाचा समावेश असतो.
  • गंभीर आजार विमा: काही ठराविक गंभीर आजारांचे निदान झाल्यास एकरकमी (lump sum) रक्कम प्रदान करते.
  • अपघात विमा:अपघातामुळे झालेल्या दुखापती, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यू यासाठी आर्थिक संरक्षण देते.
  • टॉप-अप योजना: मूलभूत (basic) आरोग्य विम्याच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्यास अधिक आर्थिक संरक्षण देते.
  • वाहन विमा (Motor Insurance): वाहनास (बाईक, कार, ट्रक इ.) अपघात, चोरी, आग, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर नुकसानीपासून आर्थिक संरक्षण
  • थर्ड पार्टी विमा (कायदेशीरदृष्ट्या आवश्यक):वाहनामुळे जर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला (माणूस/वाहन/मालमत्ता) हानी झाली, तर विमा कंपनी नुकसान भरपाई करते.
  • संपूर्ण (Comprehensive) विमा:थर्ड पार्टीसोबत तुमच्या वाहनाचे स्वतःचे नुकसानही कव्हर करते
  • व्यावसायिक वाहन विमा: व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी घेतला जातो – जसे की ट्रक, टेम्पो, टॅक्सी, बस, ऑटो, मालवाहू किंवा प्रवासी वाहने.
  • घर विमा (Home Insurance): जी तुमच्या घराला आणि त्यामधील सामानाला (घरमालमत्ता) नैसर्गिक आपत्ती, चोरी, आग, दंगल, वीज कोसळणे, इ. पासून आर्थिक संरक्षण देते
  • प्रवास विमा (Travel Insurance): देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासात अचानक उद्भवणाऱ्या समस्या जसे की आजार, अपघात, बॅग गहाळ होणे, फ्लाइट रद्द होणे, वैद्यकीय गरज, किंवा पासपोर्ट हरवणे यासाठी आर्थिक संरक्षण देते.

विमा लोकांच्या जीवनात वैयक्तिक व व्यवसायिक दोन्ही प्रकारच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे.