
विमा (Insurance) म्हणजे काय?
विमा (Insurance) म्हणजे एक आर्थिक करार, जो एखादी व्यक्ती, समूह किंवा संस्था (पॉलिसीधारक) आणि विमा कंपनी यांच्यात होतो. या कराराअंतर्गत, विशिष्ट जोखीम किंवा नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी, पॉलिसीधारक ठराविक रक्कम (अधिमूल्य) नियमितपणे भरतो.
सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर हे एक असे साधन आहे जे आर्थिक संकटाच्या वेळी मदतीस येते. एखादी अनपेक्षित घटना – जसे की अपघात, आजार, आग, चोरी किंवा मृत्यू – घडल्यास, अटी व शर्तींनुसार संबंधित व्यक्तीस किंवा त्यांच्या लाभार्थ्यांना भरपाई दिली जाते.
प्रमुख घटक(Important Factors):
Insurance घेताना त्यामध्ये काही महत्त्वाचे घटक (Components) असतात, जे Insurance पॉलिसीच्या संरचनेत आवश्यक भूमिका बजावतात.
| अ.क्र. | प्रमुख घटक | थोडक्यात माहिती |
१. | विमा धारक (Policyholder) | जी व्यक्ती किंवा संस्था अधिमूल्य (Premium) देऊन Insurance खरेदी करते आणि लाभ घेण्याचा अधिकार ठेवते. |
| २. | विमा कंपनी (Insurer) | ज्या कंपनी मध्ये Policyholder अधिमूल्य (Premium) भरतो आणि ती कंपनी त्या Policyholder ला जोखीम स्वीकारून नुकसान झाल्यास भरपाई देते. अर्थात जी कंपनी विमा सेवा देते. |
| ३. | जोखीम (Risk) | कोणतीही अनिश्चित घटना जी नुकसान घडवू शकते, उदा. अपघात, आजार, मृत्यू, आग इत्यादी. |
| ४. | अधिमूल्य (Premium) | Insurance पॉलिसीसाठी Policyholder ने भरावयाची रक्कम. ही रक्कम दर महिन्याला, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक स्वरूपात भरता येते. |
| ५. | नामनिर्देशित (Nominee) | Policyholder च्या मृत्यूनंतर ज्याला लाभ मिळणार आहे ती व्यक्ती |
| ६. | दावे आणि भरपाई (Claim and Settlement) | जर विम्याच्या अटींमध्ये नमूद घटना घडली तर Insurance कंपनीकडे दावा केला जातो आणि कंपनी भरपाई देते. |
| ७. | विमा रक्कम (Sum Assured / Coverage) | कंपनीकडून मिळणारी जास्तीत जास्त भरपाई रक्कम. |
| ८. | पॉलिसी मुदत (Policy Term) | Insurance किती कालावधीसाठी वैध आहे हे सांगणारा कालखंड. |
| ९. | अपवाद (Exclusions) | अशा घटना किंवा परिस्थिती ज्या Insurance पॉलिसीमध्ये समाविष्ट नसतात. उदा. आत्महत्या, गैर कायदेशीर कृत्ये. |
महत्त्व ( Importance):
वैयक्तिक, व्यावसायिक आणि आर्थिक स्थिरतेमध्ये विमा कशाप्रकारे महत्त्वाची भूमिका बजावतो याची प्रमुख कारणे:
१.आर्थिक संरक्षण (Financial Protection):
अपघात, आजारपण, चोरी, नैसर्गिक आपत्ती किंवा मृत्यू यासारख्या घटनांमुळे होणाऱ्या अनपेक्षित आर्थिक नुकसानापासून आपल्याला संरक्षण देतो. उदा. रुग्णालयाचे बिल, कार दुरुस्ती किंवा घराचे नुकसान यांसारखे अचानक आलेले मोठे खर्च भरून काढण्यास आपल्याला मदत करते जे आपल्याला परवडू शकत नाहीत.
२. मनाची शांती (Peace of Mind):
आर्थिक संकटापासून आपले संरक्षण झाले आहे याची आपल्याला हामी मिळाल्यामुळे आपल्याला एक मानसिक आराम मिळतो. आरोग्य , जीवन किंवा मालमत्ता Insurance असो, त्यामुळे जीवनात “जर असे आर्थिक संकट आले तर” या बद्दलचा ताण कमी होतो.
३. कायदेशीर आणि सामाजिक दायित्वे (Legal and Social Obligations):
काही प्रकारचे विमा अनेक देशांमध्ये कायदेशीररित्या आवश्यक आहेत. जसे की वाहन विमा. अशा प्रकाराचे विमा सार्वजनिक कल्याणात देखील योगदान देते – आरोग्य आणि जीवन विमा सार्वजनिक समर्थन प्रणालींवरील अवलंबित्व कमी करते.
४. आर्थिक स्थिरता वाढवते. (Promotes Economic Stability):
व्यावसायिक दृष्टीकोनातून देखील Insurance महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आर्थिक तोट्यातून वाचनाकरता मदत मिळते. Insurance घेतल्यास आपल्याला आरोग्याच्या बाबतीतही संरक्षण मिळते, ज्यामुळे आपल्याला नाण्याच्या खर्चाद्वारे आर्थिक दबाव कमी होतो.
Insurance गुंतवणूक आणि जोखीम घेण्यास प्रोत्साहन देऊन आर्थिक व्यवहारांना आधार देते. ते व्यवसायांना तोट्यातून सावरण्यास आणि कामकाज सुरू ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे रोजगार आणि वाढ टिकून राहते.
५. बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देते (Encourages Saving and Investment):
जसे की बचत घटकांसह Life insurance हे व्यक्तींना भविष्यासाठी नियोजन करण्यास मदत करतात.अशा प्रकाराचे Insurance दीर्घकालीन संपती उभारण्यात एक साधन म्हणून सहायता करू शकतील.
Insurance घेतल्याने भविष्याच्या आर्थिक संकटांपासून आपली बचत सुरक्षित राहते.
६. जोखीम व्यवस्थापन साधन (Risk Management Tool):
Insurer विविध प्रकारच्या योजनांची ऑफर देतात, ज्यामध्ये ग्राहकांची गरज पूर्ण केली जाते.
Insurance व्यक्ती आणि व्यवसाय दोघांनाही जोखीम कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यास मदत करतो. कंपन्या अनेकदा त्यांच्या धोरणात्मक नियोजन आणि जोखीम कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून Insurance चा वापर करतात.
मुख्य प्रकार (Main Types ):

१. जीवन विमा (Life Insurance):
विमा (Insurance) म्हणजे एक सुरक्षितता जिथे आपण अनपेक्षित घटनांपासून सुरक्षित राहतो.
या प्रकारच्या विम्यात Policyholder च्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते किंवा काही अशा योजना आहेत ज्या निवृत्ती/मॅच्युरिटी नंतर पैसे परत देतात.उदाहरणार्थ, Life Insurance आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक आवश्यक साधन आहे
जीवन विम्याचे प्रकार:
- टर्म (Term Insurance) – निश्चित कालावधीसाठी असतो फक्त मृत्यूचा कव्हरेज मिळतो
- पूर्ण आयुष्य (Whole Life Insurance) – संपूर्ण आयुष्यभरासाठी विमा
- एंडोमेंट योजना (Endowment Plan) – विमा + बचत, मॅच्युरिटीला पैसे परत मिळतात.
- मनी बॅक पॉलिसी (Money Back Policy) – ठराविक कालावधीनंतर हप्त्यांमध्ये पैसे मिळतात.
- युनिट लिंक Insurance Policy (ULIP) – Insurance + गुंतवणूक
- निवृत्ती योजना (Pension Plans) – निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न
२.सर्वसाधारण(General) Insurance:
हा विमा माणसांव्यतिरिक्त इतर गोष्टींचा (मालमत्ता, आरोग्य, वाहन, प्रवास इ.) संरक्षण देतो.
सर्वसाधारण विम्याचे प्रकार:
- आरोग्य (Health) Insurance: अपघात, आजार किंवा रुग्णालयीन उपचारांसाठी आर्थिक मदत मिळते.
- वैयक्तिक आरोग्य विमा: फक्त एका व्यक्तीसाठी असते. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीच्या वैद्यकीय खर्चासाठी संरक्षण दिलं जातं.
- फॅमिली फ्लोटर पॉलिसी: एकाच पॉलिसीत संपूर्ण कुटुंबाचा समावेश असतो.
- गंभीर आजार विमा: काही ठराविक गंभीर आजारांचे निदान झाल्यास एकरकमी (lump sum) रक्कम प्रदान करते.
- अपघात विमा:अपघातामुळे झालेल्या दुखापती, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यू यासाठी आर्थिक संरक्षण देते.
- टॉप-अप योजना: मूलभूत (basic) आरोग्य विम्याच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्यास अधिक आर्थिक संरक्षण देते.
- वाहन (Motor) Insurance: वाहनास (बाईक, कार, ट्रक इ.) अपघात, चोरी, आग, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर नुकसानीपासून आर्थिक संरक्षण
- थर्ड पार्टी Insurance: कायदेशीरदृष्ट्या आवश्यक, वाहनामुळे जर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला (माणूस/वाहन/मालमत्ता) हानी झाली, तर विमा कंपनी नुकसान भरपाई करते.
- संपूर्ण (Comprehensive) Insurance: थर्ड पार्टीसोबत तुमच्या वाहनाचे स्वतःचे नुकसानही कव्हर करते
- व्यावसायिक वाहन विमा: व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी घेतला जातो – जसे की ट्रक, टेम्पो, टॅक्सी, बस, ऑटो, मालवाहू किंवा प्रवासी वाहने.
- घर (Home) Insurance: जी तुमच्या घराला आणि त्यामधील सामानाला (घरमालमत्ता) नैसर्गिक आपत्ती, चोरी, आग, दंगल, वीज कोसळणे, इ. पासून आर्थिक संरक्षण देते
- प्रवास (Travel) Insurance: देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासात अचानक उद्भवणाऱ्या समस्या जसे की आजार, अपघात, बॅग गहाळ होणे, फ्लाइट रद्द होणे, वैद्यकीय गरज, किंवा पासपोर्ट हरवणे यासाठी आर्थिक संरक्षण देते.
विमा लोकांच्या जीवनात वैयक्तिक व व्यवसायिक दोन्ही प्रकारच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे.